महाळुंगेत २३ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला; दोघांना अटक

महाळुंगेत २३ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला; दोघांना अटक

महाळुंगे | १ ऑक्टोबर २०२६ : कोणतेही कारण नसताना २३ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना महाळुंगे परिसरात घडली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल शामकुमार निषाद (वय २३, रा. एचपी चौक, सावदरी रोड, महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी ओम चंद्रकांत बहादुरे (वय २४)आणि अनिल रामराव आघाडे (वय ५४) दोघे  रा. मेहेकर, जि. बुलढाणा या दोघांना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादीनुसार, ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास महाळुंगे स्मशानभूमीजवळील रस्त्यावर आणि मोकळ्या शेतात ही घटना घडली. आरोपींपैकी एकाने फिर्यादीच्या गळ्याच्या खाली चाकूने वार केला. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने फिर्यादीच्या दोन्ही हातांवर चाकूने वार करून हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच फिर्यादीला धमकी आणि शिवीगाळ करून दोन्ही आरोपींनी मिळून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादीला मारहाण करण्यामागील कोणतेही कारण नमूद करण्यात आलेले नाही.

या प्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories