वापरण्यास दिलेली स्कुटी परत देण्यास नकार; मित्रावर गुन्हा दाखल

वापरण्यास दिलेली स्कुटी परत देण्यास नकार; मित्रावर गुन्हा दाखल

मोशी | १ ऑक्टोबर २०२६ : विश्वासाने वापरण्यासाठी दिलेली ३० हजार रुपये किमतीची स्कूटी मित्राने परत न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा प्रकार मोशी परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात २२ वर्षीय तरुणाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर लालू झोले (वय २२, मोशी प्राधिकरण, मूळ  जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी फिर्यादीचा मित्र सोन्या पाटील (वय अंदाजे २२, रा. चाकण, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, ३० सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास बर्गर किंग कॅफेसमोर, भारत माता चौक, मोशी येथे हा प्रकार घडला. फिर्यादीने आरोपीकडे विश्वासाने ३० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची स्कूटी क्रमांक MH-14-MU-1837 सोपवली होती.

मात्र, आरोपीने ती स्कूटी फिर्यादीला परत न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीने आरोपीला फोन केला असता, “तुझ्याकडील ॲक्टिव्हा स्कूटी क्रमांक MH-14-MU-1837 ही माझ्याकडे नसून मला पुन्हा कॉल करू नको,” असे उत्तर देऊन आरोपीने मोबाईल बंद केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

विश्वासाने दिलेली स्कूटी परत न करता आरोपी ती घेऊन गेल्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार फिर्यादीने पोलिसांकडे केली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories