news
clock
निगडी-प्राधिकरणात उद्या 'जाणता राजा' महानाट्याचे आयोजन, शहरवासियांना विनाशुल्क प्रवेश

निगडी-प्राधिकरणात उद्या 'जाणता राजा' महानाट्याचे आयोजन, शहरवासियांना विनाशुल्क प्रवेश

महाराष्ट्र दिनी महापालिकेच्या वतीने निगडी-प्राधिकरणात 'जाणता राजा' महानाट्याचे आयोजन, शहरवासियांना विनाशुल्क प्रवेश

पिंपरी, ता. ३० - महाराष्ट्र दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरवासियांसाठी भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिला आहे. तो म्हणजे....... आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाचे ऐतिहासिक ‘जाणता राजा’महानाट्याचा प्रयोग. १ मे रोजी निगडी-प्राधिकरणातील (सेक्टर २५) मदनलाल धिंग्रा मैदानावर सायंकाळी ६.३० वाजता हा नाट्यप्रयोग होणार आहे. शहरवासियांना हे महानाट्य विनामूल्य पाहता येईल. अधिकाधिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक नाट्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे असणार आहेत. याशिवाय विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, महेश लांडगे यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभणार आहे. 

महाराष्ट्र कीर्ती सोहळा प्रतिष्ठान आयोजित आणि पद्मभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित जाणता राजा हे महानाट्य आशिया खंडात गाजले आहे. महाराष्ट्र दिनी हे महानाट्य पाहण्याची सुंदर संधी शहरवासियांना मिळणार आहे. अधिक माहिती देताना महापौर रवी लांडगे म्हणाले की,  ''महाराष्ट्र दिनी या महानाट्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यांचे शौर्य व कार्यापासून प्रेरणा घेवून या पिढीने कार्य करावे यासाठी या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. पद्मभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित ‘जाणता राजा’ हे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून त्यात त्यांच्या शौर्यगाथा, स्वराज्य स्थापनेचा इतिहास आणि मराठी अस्मितेचा अभिमान अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडण्यात आला आहे. भव्य नेपथ्य, पारंपरिक वेशभूषा, जिवंत घोडे-हत्ती, आणि शेकडो कलाकारांचा सहभाग यामुळे हे नाटक प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे शहरातील विविध स्तरांतून स्वागत होत असून, मोठ्या संख्येने नागरिकांनि उपस्थित रहावे.''







Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories