महिला धोरण निर्मितीसाठी सूचना पाठवण्याचे आवाहन

महिला धोरण निर्मितीसाठी सूचना पाठवण्याचे आवाहन

महिला धोरण निर्मितीसाठी सूचना पाठवण्याचे आवाहन 

पुणे, ता. २२ - राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर सर्व प्रकारच्या एकल महिलांच्या सर्वांगीण विकास व सक्षमीकरणासाठी शासन स्वतंत्र एकल महिला धोरण तयार करीत आहे. एकल महिलांकरिता स्वतंत्र धोरण निर्माण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

या धोरणाद्वारे महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. या धोरणाची प्रभावी व सर्वसमावेशक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी नागरिक, महिला संघटना, सामाजिक संस्था, अभ्यासक व विषयतज्ज्ञ यांच्याकडून सूचना मागवण्यात येत आहेत. 

वरील सर्वांनी आपल्या सूचना व अभिप्राय व्हॉट्सॲप क्रमांक ९८६९८६९२८३ वर पाठवावेत, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  शोभा शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.








Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories