news
clock
शहरात ४२ केंद्रांवर इयत्ता चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत, एकूण १२ हजार ९७९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

शहरात ४२ केंद्रांवर इयत्ता चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत, एकूण १२ हजार ९७९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

शहरात ४२ केंद्रांवर इयत्ता चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत, एकूण १२ हजार ९७९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा 

पिंपरी, ता. २७  - पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (ता. २६) पिंपरी-चिंचवड शहरातील ४२ केंद्रांवर सुरळीत पार पडली. चौथीच्या ७ हजार ४९० आणि साचवीच्या ४ हजार ८८० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. ही परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमांत घेण्यात आली, अशी माहिती महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी संगिता बांगर यांनी दिली. 

इयत्ता चौथीसाठी ४२ केंद्रांवर एकूण ८२२८ विद्यार्थ्यांपैकी ७४९० विद्यार्थी (९१ टक्के) उपस्थित होते. इयत्ता सातवीसाठी २९ केंद्रांवर नोंदणी केलेल्या ५ हजार ४८९ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ८८० विद्यार्थी (८९ टक्के) परीक्षेला हजर होते. या परीक्षेसाठी ७१ केंद्र संचालक, ७ सहकेंद्र संचालक, ६७२ पर्यवेक्षक व १७२ शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

परीक्षेचे दोन पेपर घेण्यात आले. पहिला पेपर (प्रथम भाषा व गणित) सकाळी ११ ते १२:३० या वेळेत, तर दुसरा पेपर (तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी) दुपारी २ ते ३:३० यावेळेत पार पडला. पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर व सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. सर्व केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडल्याची माहिती प्रशासन अधिकारी बांगर यांनी दिली.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories