राज्यातील तीर्थक्षेत्रे, गड-किल्ले आणि ऐतिहासिक वारशाच्या विकासासाठी तब्बल रुपये ९९३ कोटींचा निधी मंजूर

राज्यातील तीर्थक्षेत्रे, गड-किल्ले आणि ऐतिहासिक वारशाच्या विकासासाठी तब्बल रुपये ९९३ कोटींचा निधी मंजूर

राज्यातील तीर्थक्षेत्रे, गड-किल्ले आणि ऐतिहासिक वारशाच्या विकासासाठी तब्बल रुपये ९९३ कोटींचा निधी मंजूर

पुणे, ता. २० -  राज्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांच्या जतन-संवर्धनासाठी शिखर समिती बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राज्यातील तीर्थक्षेत्रे, गड-किल्ले आणि ऐतिहासिक वारशाच्या विकासासाठी तब्बल रुपये ९९३ कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.  राज्यातील तीर्थक्षेत्रे, गड-किल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणांवर भाविक आणि पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा, आरोग्य सेवा आणि शाश्वत विकासावर भर देण्यात येणार आहे. महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळांचाही जीर्णोद्धार व परिसर विकास होणार आहे. महाराष्ट्राचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा अधिक भव्य, सुशोभित आणि जागतिक दर्जाचा करण्याच्या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहे.

निधीची तरतूद अशी ....

🔸 श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास – रु. १७२.२२ कोटी

🔸 संत तुकाराम महाराज जन्मस्थान संवर्धन – रु.  ४१.७१ कोटी

🔸 संगम माहुली समाधिस्थळ संवर्धन – रु.  १३३ कोटी

🔸 घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास – रु.  २१०.४५ कोटी

🔸 परळी वैजनाथ विकास आराखडा – रु.  ३०१.५४ कोटी

🔸 अजिंक्यतारा किल्ला संवर्धन – रु.  १३४.८० कोटी



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories