'शिवशाही शासन' या नव्या राजकीय पक्षाची स्थापना, सामाजिक कार्यकर्ते युवराज दाखले यांची घोषणा
May 22 2026
10
'शिवशाही शासन' या नव्या राजकीय पक्षाची स्थापना, सामाजिक कार्यकर्ते युवराज दाखले यांची घोषणा
पिंपरी, ता. २२ - "सत्तेसाठी नाही, तर सर्वसामान्यांच्या सेवेसाठी" हे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक कार्यकर्ते युवराज दाखले यांनी शुक्रवारी (ता. २२) 'शिवशाही शासन' या नव्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचे राज्य व आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या समतेच्या विचाराने प्रेरित होऊन हा पक्ष स्थापन केल्याचे युवराज दाखले यांनी सांगितले.
दाखले म्हणाले, "गेली 70 वर्षे प्रस्थापित पक्षांनी गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार, मातंग, बहुजन समाज, तृतीयपंथी भगिनी, व्यापारी यांचा फक्त मतांसाठी वापर करुन त्यांची फसवणूक केली आहे. शिक्षणाचा बाजार, बेरोजगारी, मुलभूत सुविधांच्या समस्यांनी महाराष्ट्र पोखरला आहे. आता वंचितांना सत्तेत भागीदारी मिळवून देण्यासाठी 'शिवशाही शासन' मैदानात उतरत आहे.हा पक्ष नेत्यांचा नाही, तर कार्यकर्त्यांचा व जनतेचा असेल. 'शिवशाही शासन' म्हणजे सेवेचे शासन. जो वंचितांच्या बाजूने उभा राहील, तोच शिवशाही शासनाचा सच्चा सैनिक असेल." पक्षाचे चिन्ह व निशाणी लवकरच जाहीर करण्यात येईल, असे युवराज दाखले यांनी सांगितले.
शिवशाही शासन पक्षाची पंचसूत्री -
1. शिक्षण: खासगी क्लासेसची लूट बंद, सरकारी शाळा मजबूत. SC/ST/OBC/NT/VJNT साठी मोफत उच्च शिक्षण.
2. रोजगार: प्रत्येक घरात एक नोकरी, तृतीयपंथी-विधवा-दिव्यांगांसाठी विशेष योजना.
3. स्वच्छता व आरोग्य: "नालामुक्त-रोगमुक्त महाराष्ट्र" मोहीम. प्रत्येक प्रभागात मोफत दवाखाना.
4. शेतकरी-कामगार-व्यापारी:शेतमालाला हमीभाव, कामगारांना किमान 25 हजार पगार, व्यापाऱ्यांवरील जाचक अटी रद्द.
5. स्वाभिमान: छत्रपती शिवाजी महाराज, आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व इतर महापुरुषांच्या विचाराने वंचितांना सन्मान व सत्तेत वाटा
- , visionary leaders, social justice, empowerment, inclusion
- , छत्रपती शिवाजी महाराज, Chhatrapati Shivaji Maharaj, लहुजी वस्ताद साळवे, Lahuji Vastad Salve,
- , party launch, Pimpri, महाराष्ट्र, Maharashtra,
- शिवशाही शासन, Shivshahi Shasan, युवराज दाखले, social activist, political party,
- Dr. Babasaheb Ambedkar,