news
clock
कान्हे येथे येत्या गुरुवारी 'मावळरत्न' पुरस्कार सोहळा,  मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळातर्फे आयोजन

कान्हे येथे येत्या गुरुवारी 'मावळरत्न' पुरस्कार सोहळा, मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळातर्फे आयोजन

कान्हे येथे येत्या गुरुवारी 'मावळरत्न' पुरस्कार सोहळा,  मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळातर्फे आयोजन 

पिंपरी, ता. १४ - मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने सामाजिक, धार्मिक, सांप्रदायिक, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मावळ तालुक्यातील व्यक्तींना 'मावळरत्न' पुरस्काराने गौरवण्यात येते. 

यंदाचा पुरस्कार सोहळा गुरुवारी (ता. १९) कान्हे येथील साईबाबा सेवाधाम ट्रस्टच्या प्रांगणात होणार आहे.  या पुरस्कारांचे वितरण खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि बाळासाहेब काशीद यांच्या हस्ते होणार आहे. 

यंदा ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग महाराज उंडे, ज्येष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज ठाकर, पवनमावळातील समाजसेवक व गोपालक नितीन महाराज घोटकुले तसेच वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारे सोमाटणे येथील स्पर्श हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित वाघ यांना 'मावळरत्न पुरस्कार' प्रदान करण्यात येईल, अशी माहिती मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे यांनी दिली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories