पिंपरी-चिंचवडमध्ये १५ ऑगस्टपासून मेट्रो स्थानकांवर मीटरप्रमाणे रिक्षा चालणार, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचा निर्णय

पिंपरी-चिंचवडमध्ये १५ ऑगस्टपासून मेट्रो स्थानकांवर मीटरप्रमाणे रिक्षा चालणार, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचा निर्णय

पिंपरी-चिंचवडमध्ये १५ ऑगस्टपासून मेट्रो स्थानकांवर मीटरप्रमाणे रिक्षा चालणार, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचा निर्णय 

अतिरिक्त पोलिस आयुक्त सारंग आव्हाड यांच्या भेटीनंतर निर्णय घेतल्याची डॉ. बाबा कांबळे यांची माहिती 

पिंपरी, ता. ३० जुलै २०२६ - ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या कंपन्यांची मनमानी थांबवण्यासाठी तसेच रिक्षाचालक-मालकांचे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतने १५ ऑगस्ट २०२६ पासून पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहरातील पीसीएमसी मेट्रो स्टेशन व आसपासच्या सर्व रिक्षा स्टँडवरून मीटरप्रमाणे सेवा देण्याचा निर्णय प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केला आहे. अशी माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी दिली आहे. 

 डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलिस आयुक्त सारंग आव्हाड यांची भेट घेतली. या भेटीनंतर महाराष्ट्र रिक्षा पंचायतने प्रसिद्ध पत्रक जाहीर करून आपला निर्णय जाहीर केला आहे. बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरात अधिकृतपणे मीटरने रिक्षा व्यवसाय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. अतिरिक्त पोलिस आयुक्त सारंग आव्हाड यांनी रिक्षाचालकांनी मांडलेल्या विषयाची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाच्या वतीने पूर्ण सहकार्य व आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ऑगस्ट २०२६ पासून पीसीएमसी मेट्रो स्थानके व परिसरातील रिक्षा स्टँडवर अधिकृतपणे मीटरने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात सध्या ५५ हजारांहून अधिक रिक्षा चालक-मालक आहेत. ऑनलाइन अ‍ॅप आधारित कंपन्यांमुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. मीटर प्रमाणे व्यवसाय न केल्याने प्रवाशांचा विश्वासही कमी होत आहे. यावर मात करण्यासाठी मीटरने रिक्षा चालवणे आणि ‘शेअर-ए-रिक्षा’ सेवा सुरू करणे हा प्रभावी पर्याय असल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विजय ढगारे पाटील स्पष्ट केले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories