उत्तर म्हाळुंगे येथे अवैधरीत्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या युवकाला अटक

उत्तर म्हाळुंगे येथे अवैधरीत्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या युवकाला अटक

उत्तर म्हाळुंगे येथे अवैधरीत्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या युवकाला अटक 

पिंपरी, ता. २२ - घरगुती गॅस सिलिंडरमधून अवैधरीत्या गॅस भरण्याचा धोकादायक प्रकार उत्तर म्हाळुंगे परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार दि. २० जून २०२६ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास सावरदरी गावठाण, ग्रामपंचायत शेजारी, मोरया गॅस सर्व्हिसेस येथे घडला.

पोलिस कॉन्स्टेबल समीर शब्बीर महात ( नेमणूक उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपी पवन महादेव सातपुते (वय २१, रा. सावरदरी, ता. खेड, जि. पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ज्वालाग्राही पदार्थांबाबत आवश्यक सुरक्षिततेचे नियम न पाळता, मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने घरगुती सिलिंडरमधून गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरत असताना तो आढळून आला. सुमारे ३१,६०० रुपये किंमतीचा गॅस अशा प्रकारे हाताळण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३, ७ आणि पुरवठा व वितरण नियमन आदेश २००० अंतर्गत कलम ३ ते ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories