फुगेवाडी येथील विषारी दारु प्रकरणातील मृत नागरिकांच्या कुटुंबियांची मंत्री गिरीश महाजन घेतली भेट
Jun 01 2026
18
फुगेवाडी येथील विषारी दारु प्रकरणातील मृत नागरिकांच्या कुटुंबियांची मंत्री गिरीश महाजन घेतली भेट
पिंंपरी, ता. ३० - दापोडी व फुगेवाडी या परिसरात विषारी दारूच्या सेवनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली असून याबाबत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांची शनिवारी (ता. ३०) आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे. तसेच विषारी दारुच्या सेवनाने अत्यवस्थ झालेल्या रुग्णांची यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेऊन संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
सदर घटना घडलेल्या परिसरात भेट देऊन नागरिकांसोबत संवाद साधला. दारू हे समाजाला लागलेले ग्रहण आहे, हे ग्रहण सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे यावेळी आवाहन केले. तसेच, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस प्रशासनाला या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
आपल्या बांधवांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराला कठोर शासन होईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, महापौर रवी लांडगे, सभागृह नेते प्रशांत शितोळे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
- बेकायदेशीर दारू, Illegal Liquor, मुख्यमंत्री, Devendra Fadnavis, पोलिस चौकशी, Police Investigation, कठोर कारवाई, Strict Action,
- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, Yashwantrao Chavan Memorial Hospital, रुग्णांची भेट, Hospital Visit, विषारी मद्य, Spurious Liquor
- पुणे, Pune, मृत नागरिक, Deceased Citizens, कुटुंबीयांची भेट, Family Visit, सांत्वन, Condolence Visit
- फुगेवाडी, दापोडी, विषारी दारू प्रकरण, Toxic Liquor Case, गिरीश महाजन, Girish Mahajan,