‘मिसिंग लिंक’बोगद्यात भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर, वाकडमधील तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू
‘मिसिंग लिंक’बोगद्यात भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर, वाकडमधील तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू
पिंपरी, ७ ऑगस्ट २०२६ - मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात वाकड येथील सामाजिक-राजकीय कार्यकर्ते तुषार भूमकर (वय ३७) यांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या फॉर्च्युनर कारने समोरून जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारमध्ये बसलेले भूमकर मरण पावले, एक जण गंभीर जखमी झाला अन्य तिघे जण बचावले आहेत.
मध्यरात्री दीडच्या सुमारास भूमकर व त्यांचे सहकारी फॉर्च्युनर कारमधून पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. अतिवेगात असलेल्या कारने मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की फॉर्च्युनरचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या घटनेनंतर काही वेळासाठी मिसिंग लिंकवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आणि ती जुन्या मार्गावरून वळवण्यात आली. महामार्ग पोलिस आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवली. त्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना मिसिंग लिंकच्या टनेलमध्ये चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
फॉर्च्युनर कारमधील पाचही प्रवासी पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड (भूमकर चौक) येथील रहिवासी आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे. अपघातात मरण पावलेल्या तुषार भूमकर यांचा येत्या 28 तारखेला वाढदिवस होता. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने वाकड परिसरावर शोककळा पसरली आहे.
- तुषार भूमकर, Tushar Bhumkar, वाकड, Wakad, भूमकर चौक, Bhumkar Chowk
- कार अपघात, Car Accident, टेम्पोला धडक, Tempo Collision, भीषण अपघात, Fatal Accident, Tunnel Accident
- फॉर्च्युनर अपघात, Fortuner Accident
- मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, Mumbai Pune Expressway, मिसिंग लिंक बोगदा, Missing Link Tunnel, Missing Link