पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज, अधिकाऱ्यांची नियुक्ती

पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज, अधिकाऱ्यांची नियुक्ती

 पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज, अधिकाऱ्यांची नियुक्ती 

पिंपरी, ता. २७ - पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उप आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून, अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद, प्रभावी समन्वय आणि नागरिकांपर्यंत त्वरित मदत पोहोचविणे हे या यंत्रणेचे प्रमुख उद्दिष्ट असून, नागरिकांना वेळेवर आणि सक्षम मदत मिळावी यासाठी महापालिका पूर्णतः सज्ज आहे, असे महापौर  रवी लांडगे यांनी सांगितले.  आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories