वाकड | २ ऑक्टोबर २०२६ : भुजबळ चौक परिसरातील हॉटेल अन्नपूर्णीसमोर पार्क केलेली होंडा शाईन मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुप जयप्रकाश तिवारी (वय २८, रा. भुजबळ चौक, वाकड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान, भुजबळ चौकात घडली.
फिर्यादीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ अनुज याने त्याची होंडा शाईन मोटारसायकल क्रमांक MH 14 / U.L. / 7865 हॉटेल अन्नपूर्णीसमोर पार्क केली होती. या कालावधीत अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादीच्या संमतीशिवाय ही मोटारसायकल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार नदाफ करत आहेत.