'एसटी' महामंडळाची अष्टविनायक दर्शन बससेवा पुन्हा सुरु, १ ऑगस्टला सुटणार २ गाड्या

'एसटी' महामंडळाची अष्टविनायक दर्शन बससेवा पुन्हा सुरु, १ ऑगस्टला सुटणार २ गाड्या

'एसटी' महामंडळाची अष्टविनायक दर्शन बससेवा पुन्हा सुरु, १ ऑगस्टला सुटणार २ गाड्या

पिंपरी, ता. ३० जुलै २०२६ - पुरातत्त्व विभागामार्फत अष्टविनायक मंदिरांच्या जतन व संवर्धनाची कामे हाती घेण्यात आली. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून ही मंदिरे भाविकांसाठी बंद होती. आता रांजणगाव वगळता इतर मंदिरे खुली झाली असल्याने राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाची अष्टविनायक दर्शन बस यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 

संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शन यात्रेसाठी शिवाजीनगर आणि वल्लभनगर आगारामधून शनिवारी (ता. १) बस सोडण्यात येणार आहेत. या बसचे तिकीटदर प्रौढांसाठी प्रतिव्यक्ती १३२० रुपये तर मुलांसाठी ६६० रुपये असणार आहे. या यात्रा प्रवासासाठी महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ज्येष्ठांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. यात्रेदरम्यान ओझरच्या निवासात राहण्याची व जेवणाची उत्तम सोय असून तो खर्च प्रत्येक प्रवाशाने स्वतः करावयाचा आहे. 

अष्टविनायक दर्शनासाठी ऑनलाइन आरक्षण सुरू झाले असून महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर आणि ॲपवर आरक्षण करता येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories