मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे गुरुवारी व शुक्रवारी दुपारी १२ ते ३ यावेळेत वाहतूकीसाठी बंद राहणार
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे गुरुवारी व शुक्रवारी दुपारी १२ ते ३ यावेळेत वाहतूकीसाठी बंद राहणार
पुणे, ता. २२ - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी (ता. २३) व शुक्रवारी (ता. २४) दुपारी १२ ते ३ यावेळेत वाहतूक पूर्णतः बंद ठेवली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक जाहीर केला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रस्ता बंद असताना मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व वाहनांना किवळे-देहू रोड मार्गे कुसगाव टोल प्लाझा येथून मुंबई दिशेने वळवण्यात येईल आणि पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व वाहनांना कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून देहू रोड-किवळे येथे पोहोचवून पुण्याकडे पाठवण्यात येईल. संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रवाशांनी वेळेची योग्य आखणी करावी, अशी सूचना देण्यात आली आहे.
एमएसआरडीसीने वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी तांत्रिक कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रस्ता बंद असताना पर्यायी मार्गांचा वापर करुन प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.