'नीट'ची फेरपरीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'नीट'ची फेरपरीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'नीट'ची फेरपरीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'नीट' फेरपरीक्षेच्या पूर्व तयारीसंदर्भात प्रशासनाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक 

पुणे, ता. ६ - नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे 'NEET UG 2026' ची फेरपरीक्षा (Re-exam) आता २१ जून २०२६ (रविवार) रोजी घेतली जाणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावरहित वातावरण असावे. सर्व  यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करुन कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी अधिक दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्व तयारीसंदर्भात आयोजित बैठकीत दिले.

सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून त्याचे नियंत्रण करावे. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची तपासणी व ओळख पडताळणी प्रक्रिया काटेकोरपणे राबवावी. परीक्षेसंदर्भातील अचूक माहिती विद्यार्थी, पालक आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून व्यापक जनजागृती करावी, तसेच परीक्षा प्रक्रियेबाबत अफवा किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित झाल्यास त्याचा तातडीने खुलासा करून विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

पुणे आणि लातूर येथील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, याची दक्षता घेण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, पावसाच्या दृष्टीने पूर्वतयारी आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करुन परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, शिक्षण विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories