गाण्याच्या आवाजाच्या मोठा असल्याच्या कारणावरून शेजाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण

गाण्याच्या आवाजाच्या मोठा असल्याच्या कारणावरून शेजाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण

गाण्याच्या आवाजाच्या मोठा असल्याच्या कारणावरून शेजाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण

पिंपरी, ता. ३० - इंदोरी (ता. मावळ) येथील ठाकरवस्ती परिसरात गाण्याचा आवाज मोठा असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी (ता. २८) रात्री ९ वाजता घडली. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २९) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश शंकर शिंदे (वय ३१, रा. ठाकरवस्ती, इंदोरी, ता. मावळ) हे कुटुंबासह घरी जेवण करत असताना त्यांचे शेजारी दीपक गायकवाड हे घरी आले. गाण्याचा आवाज मोठा असल्याच्या कारणावरून गायकवाड यांनी शिंदे यांच्याशी वाद घालत लाकडी दांडक्याने त्यांच्या डाव्या हातावर, डोक्यात, डाव्या कानावर व मानेजवळ मारहाण केली. या मारहाणीत शिंदे यांच्या डाव्या कानाला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांच्या पत्नी रिकी शिंदे यांना आरोपी दीपक गायकवाड यांच्या पत्नीने शिवीगाळ करून दमदाटी केली. 

या प्रकरणी दीपक गायकवाड व त्यांच्या पत्नीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८, ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये रविवारी (दि. २९) पहाटे २.४३ वाजता तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories