पाण्याची नासाडी टाळा, पाणी काटकसरीने वापरा, जलसंपदा विभाग व महापालिकेचे नागरिकांना आवाहन

पाण्याची नासाडी टाळा, पाणी काटकसरीने वापरा, जलसंपदा विभाग व महापालिकेचे नागरिकांना आवाहन

 पाण्याची नासाडी टाळा, पाणी काटकसरीने वापरा, जलसंपदा विभाग व महापालिकेचे नागरिकांना आवाहन  

 पवना धरणात शहराला केवळ ४५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक

पिंपरी, ता. १५ - पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात शहराला केवळ ४५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस आणखी लांबल्यास पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, अशी सूचना जलसंपदा विभागाने दिली आहे. ''संभाव्य कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे.'', असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेला केले आहे.  

सध्या पिंपरी चिंचवडमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून दररोज सुमारे ५२० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलून निगडी प्राधिकरण येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. तेथून शहराला पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय, एमआयडीसीकडून ३० एमएलडी आणि आंद्रा पाणी योजनेअंतर्गत निघोजे येथील इंद्रायणी नदी बंधाऱ्यातून ८० ते ९० एमएलडी पाणी उचलून चिखली जलशुद्धीकरण केंद्रामार्फत शहराच्या काही भागांना पुरवठा केला जातो.

उन्हाच्या तीव्रतेने पवना धरणातील पाणीसाठा मी होत आहे. धरणात पिंपरी-चिंचवड शहराला पुढील ४५ दिवस पुरेल इतका सध्याचा पाणीसाठा आहे. पाऊस लवकर आल्यास पाणी उपलब्ध होईल. पाऊस लांबल्यास शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, असे पवना धरण व्यवस्थापनाचे कनिष्ठ अभियंता रजनीश बारिया यांनी सांगितले.

 प्रत्येक नागरिकाने पाणी बचतीची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याची नासाडी टाळावी वाहने धुण्यासाठी पाइपऐवजी बादली वापरावी नळ, फ्लश, टाक्यांची गळती दुरुस्त करावी अंगण, रस्ते व पार्किंग धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये सोसायट्यांमध्ये पाणी वापरावर नियंत्रण ठेवावे पावसाचे पाणी साठवण आणि पुनर्वापराला प्राधान्य द्यावे अनधिकृत मोटारी लावून पाणी उपशाची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. 


थोडक्यात - 

-  पवना धरणातील पाणीसाठा - २०.८७ टक्के

- सध्याचा पुरवठा - ५५५ एमएलडी 

- दररोजची तूट - ९५ एमएलडी


महत्त्वाच्या सूचना.......

- वाहन धुणे, अंगण धुणे यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा.

- स्विमिंग पूल, वॉटर पार्क व इतर मनोरंजनासाठी होणारा पाण्याचा वापर मर्यादित ठेवावा.

- बांधकाम प्रकल्पांमध्ये शक्यतो पुनर्वापरित (Recycled) पाणी वापरणे बंधनकारक करावे.

- पाण्याच्या गळती तात्काळ दुरुस्त कराव्यात.

- सोसायटी, हॉटेल, मॉल व व्यावसायिक आस्थापनांनी पाणी बचतीची विशेष उपाययोजना करावी.

- रेनवॉटर हार्वेस्टिंग व सांडपाणी पुनर्वापराला प्राधान्य द्यावे.                    

- बेकायदेशीर पाणी उपसा व पाण्याचा अपव्यय आढळल्यास प्रशासनास कळवावे.

- सार्वजनिक नळ व टाक्यांमधील पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी.

- बागांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.

- पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक गरजांसाठीच करावा.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories