पिंपरी-चिंचवड महापालिकेतील २१ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील २१ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त

पिंपरी | ३० सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून सप्टेंबर २०२६ अखेर एकूण २१ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त झाले. यामध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या १९ जणांसह स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महापालिकेच्या वतीने आयोजित सोहळ्यात सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत मधुकर पवळे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. “वर्षानुवर्षे निष्ठा, शिस्त आणि कर्तव्यभावनेने शहराची सेवा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भक्कम पायावर उभी आहे,” अशा शब्दांत सह आयुक्त लोणकर यांनी सेवानिवृत्तांच्या कार्याचा गौरव केला.

नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये उपअभियंता गणेश राऊत, कार्यालय अधीक्षक रमेश यादव, मुख्याध्यापक पुष्पा शिंदे, रजनी आहेर, अनुजा सोनगरे, मुख्य लिपिक रामू गेंगजे, रोहिणी ढेंबरे, सिस्टर इनचार्ज पौर्णिमा आमले, जलधारा टिपले, कॉम्प्युटर ऑपरेटर अरुण गुंडगळ, उपशिक्षक नीलिमा भांबेरे, सुनिता शेजवळ, रखवालदार बाळू लांडगे, लिफ्टमन विलास गायकवाड, मजूर हंसराज सजनियाल, लक्ष्मण मानमोडे, पांडुरंग गवारी, सफाई कामगार सविता काळभोर आणि नंदकुमार भोंडवे यांचा समावेश आहे.

स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्यांमध्ये सफाई कामगार राजेश गंगावणे आणि कचरा कुली गणेश यादव यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाला मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य लिपिक माया वाकडे, नंदकुमार इंदलकर यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories