लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त महापालिकेकडून विविध सांस्कृतिक, वैचारिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त महापालिकेकडून विविध सांस्कृतिक, वैचारिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन
१ ते ७ ऑगस्ट दरम्यान निगडीतील भक्ती-शक्ती चौकामध्ये उभारण्यात आलेल्या सभामंडपामध्ये होणार कार्यक्रम
पिंपरी, ता. १ ऑगस्ट २०२६ - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 'विचार प्रबोधन पर्व - २०२६'चे आयोजन १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे करण्यात आले आहे. या सात दिवसीय महोत्सवात सामाजिक प्रबोधन, वैचारिक परिसंवाद, साहित्यिक, संगीत, लोककला, व्याख्याने आणि कवी संमेलन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रबोधन पर्वाची सुरुवात शनिवारी (ता. १) महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस आणि भक्ती-शक्ती चौक येथे त्यांच्या पुतळ्यास महापौर रवी लांडगे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली.
दिवसभरात सनईवादन, येडेश्वरी हलगी ग्रुपकडून हलगीवादन, बँड स्पर्धा, "ही छक्कड अण्णाभाऊं" हा शिवाजी भिसे यांचा कार्यक्रम तर बापू पवार यांचा लेखणीचा बादशहा हा कार्यक्रम, दुपारी‘हास्यकल्लोळ’आणि ‘स्वरचंदन’ हा सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे यांचा प्रबोधनपर गीतगायनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजता ‘महाराष्ट्राची लोकसंस्कृती’ आणि सायंकाळी ७ वाजता ‘मेरा भारत महान’ या देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
रविवारी (२ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता सनईवादनाने दिवसाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता मराठी म्युझिक कॉन्सर्ट हा राधा खुडे यांचा गीतगायन कार्यक्रम, दुपारी १२.०० वाजता ‘ऑरा’ सांस्कृतिक कार्यक्रम स्मिता गायकवाडव मानसी भोसले या सादर करणारआहेत. , दुपारी १.३० वाजता अनिकेत जवळेकर हे ‘स्वरलहरी’ गीतांद्वारे अण्णा भाऊंना अभिवादन करतील, दुपारी ३ वाजता ‘आरक्षणाची समता व उपवर्गीकरणाची गरज आणि वास्तव’ या विषयावरील परिसंवाद, सायंकाळी ५ वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील हे ‘आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे – क्रांतीचा धगधगता इतिहास’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत तर सायंकाळी ६.०० वाजता ६५ कलाकारांचा ‘फोक संस्कृती’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
सोमवारी (३ ऑगस्ट) सकाळी १० वाजता हा कार्यक्रम लखन असायचे हे ‘पठ्ठा लहुजींचा’, तर सकाळी ११ वाजता ‘गीते अण्णा भाऊंची हा कार्यक्रम गायत्री शेलार व नीलेश देवकुळे सादर करतील.दुपारी १ वाजता ‘अण्णांची गौरवगाथा’ हे कार्यक्रम होणार असून, दुपारी ३.०० वाजता ‘मातंग समाजाचा प्राचीन इतिहास’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता ‘स्वर पंचम’ हा संगीत कार्यक्रम आणि सायंकाळी ७.०० वाजता ‘गजर अण्णाचा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक चंद्रकात शिंदे हे सादर करणार आहेत.
मंगळवारी (४ ऑगस्ट) राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम, सकाळी ११.३० वाजता ‘गीते अण्णाभाऊंची’, दुपारी १.०० वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे कौटुंबिक व सामाजिक व्यवस्थेवरील प्रबोधनपर व्याख्यान, दुपारी २ वाजता काजल शिंदे यांचे महिला जनजागृतीपर व्याख्यान, दुपारी २.३० वाजता ‘मातंग समाजातील शिक्षणातील आव्हाने व सामाजिक उपाय’ या विषयावरील परिसंवाद, सायंकाळी ५.०० वाजता ‘खेळ पैठणीचा’ हा महिलांसाठी कार्यक्रम आणि सायंकाळी ७.०० वाजता ‘माय मराठी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
बुधवारी (५ ऑगस्ट) सकाळी १० वाजता अमर पुणेकर व आरती पुणेकर हे प्रबोधनपर गीते सादर करतील.दुपारी १२ वाजता ‘गाता शूर वीरांची’, दुपारी २.०० वाजता ‘साहित्य सम्राट अण्णाभाऊ महान’ हा सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी ३ वाजता ‘महिला सक्षमीकरण : आजची गरज व उद्याची आव्हाने’ या विषयावरील परिसंवाद, सायंकाळी ५.०० वाजता सुप्रसिद्ध गायक साजन बेद्रे हे ‘अण्णा तुमच्यासाठी’ हा लोकगीते व प्रबोधनपर गीते सादर करतील आणि सायंकाळी ७.०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवारी (६ ऑगस्ट) सकाळी १०.३० वाजता निमंत्रित कवींचे कवी संमेलन आयोजित केले आहे.यांचे संयोजन सुनिल भीसे व विशाल कसबे करणार आहेत. दुपारी १.०० वाजता गीत प्रबोधन, दुपारी ३.०० वाजता प्रबोधनपर गीतगायन, दुपारी ४.०० वाजता ‘लेखणीचा बादशहा’, सायंकाळी ५.०० वाजता सुप्रसिद्ध गायक आमदार गीत फेम संकल्प गोळे आणि सायंकाळी ७.०० वाजता ‘जॉयल म्युझिकल नाईट्स’ या कार्यक्रमांनी रसिकांची मेजवानी होणार आहे.
शुक्रवारी (७ ऑगस्ट) समारोपाच्या दिवशी सकाळी १०.३० वाजता ‘साहित्याची खाण – अण्णा भाऊ महान’ पल्लवी घोडे या सादर करतील तर सकाळी ११.३० वाजता आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावरील व्याख्यान प्रा.प्रदीप कदम हे देणार आहेत. दुपारी १२.३० वाजता अण्णा भाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावरील गीतांचा कार्यक्रम, दुपारी २.०० वाजता प्रबोधनपर गीते, दुपारी ४.०० वाजता शाहीर युवराज ढगे व निवास चव्हाण हे सादर करणार आहेत. पोवाड्यांचा कार्यक्रम, सायंकाळी ५.०० वाजता पद्मश्री गिरीश प्रभुणे व माजी राज्यसभा सदस्य डाॅ.विनय सहस्त्रबुध्दे यांचे हस्ते सत्कार समारंभ होणार आहे तसेच सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ‘महाराष्ट्राचा मराठी बाणा’ या ३० कलाकारांच्या भव्य गीतमय कार्यक्रमाने या प्रबोधन पर्वाचा समारोप होणार आहे.
सप्ताहातील सर्व कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असतील. प्रबोधन पर्वामध्ये राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, अभ्यासक, व्याख्याते, साहित्यिक, कलाकार आणि लोककला सादर करणारे कलाकार सहभागी होणार आहेत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा, सामाजिक समता, लोकसंस्कृती आणि प्रबोधनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.