शहराच्या जलसुरक्षेसाठी पाणी काटकसरीने वापरा, महापालिका प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

शहराच्या जलसुरक्षेसाठी पाणी काटकसरीने वापरा, महापालिका प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

शहराच्या जलसुरक्षेसाठी पाणी काटकसरीने वापरा, महापालिका प्रशासनाचे नागरिकांना आवाहन 

पिंपरी, ता. २३ -  पवना धरणातील पाणीसाठ्यात झालेली घट आणि मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

शहरातील उपलब्ध जलस्रोतांवर वाढता ताण लक्षात घेऊन महापालिकेकडून पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याचा वापर करून स्विमिंग पूल भरण्यास बंदी घालण्यात आली असून वाहन धुण्यासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

पाणी बचतीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच घरगुती पातळीवर पाण्याची गळती रोखणे, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी गृहनिर्माण संस्था व नागरिकांनी पावसाच्या पाण्याचे संकलन आणि साठवणुकीवर भर द्यावा, असे आवाहन केले आहे. तर कार्यकारी अभियंता महेश बरीदे यांनी भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.

जलसंवर्धन सामूहिक जबाबदारी......

"पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. तिचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. पाणी बचतीच्या सवयी अंगीकारल्यास भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित जलसाठा निर्माण करण्यास मदत होईल. प्रत्येक नागरिकाने पाणी जपून वापरून शहराच्या जलसुरक्षेत योगदान द्यावे."

— रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


नागरिकांनी पाणी बचतीच्या उपक्रमांत सहभागी व्हावे.....

"शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांवर ताण वाढत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे आवश्यक आहे. नागरिकांनी पाण्याचा पुनर्वापर करण्यास प्राधान्य द्यावे आणि पाणी बचतीच्या उपक्रमांना सहकार्य करावे."

— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका







Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories