पिंपरी-चिंचवड भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत संघटनात्मक कार्यक्रम व पक्षाच्या बळकटीकरणाबाबत चर्चा

पिंपरी-चिंचवड भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत संघटनात्मक कार्यक्रम व पक्षाच्या बळकटीकरणाबाबत चर्चा

 पिंपरी-चिंचवड भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत संघटनात्मक कार्यक्रम व पक्षाच्या बळकटीकरणाबाबत चर्चा 

पिंपरी, ता. २९ - भारतीय जनता पार्टी पिंपरी- चिंचवड जिल्ह्याची अत्यंत महत्त्वाची कोअर कमिटी बैठक रविवारी (ता. २८) शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पिंपळे सौदागर येथे झालेल्या या बैठकीला शहरातील भारतीय जनता पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी आणि ज्येष्ठ नेते उपस्थित होते. ​बैठकी दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शहरात प्रभावीपणे राबविल्या गेलेल्या पक्षाच्या विविध अभियानांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे आणि अभियानांच्या यशाचे यावेळी कौतुक करण्यात आले. यासोबतच आगामी काळातील नवीन संघटनात्मक कार्यक्रम आणि पक्षाच्या बळकटीकरणा संदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली. पक्ष संघटन अधिक गतिमान करण्यासाठी आणि शासकीय योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या बैठकीत काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय एकमताने घेण्यात आले.

संघटनात्मक बळकटीकरणासाठी भाजप कटिबद्ध - ​

बैठकीविषयी माहिती देताना शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले की,"पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीचे संघटन अत्यंत मजबूत आहे. आज कोअर कमिटीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात आम्ही पुढील काळातील संघटनात्मक कार्यक्रमांची दिशा निश्चित केली आहे. सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून आगामी काळातील सर्व अभियाने आम्ही यशस्वी करू आणि पक्षाचा विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवू."

 या उच्चस्तरीय बैठकीला आमदार महेश लांडगे,​आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार ​उमा खापरे,​ माजी खासदार अमर साबळे, आमदार अश्विनी जगताप, संगठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे,​ सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते ​प्रशांत शितोळे उपस्थित होते. ​या बैठकीमुळे पिंपरी-चिंचवड भाजपच्या गोटात अधिक उत्साह निर्माण झाला असून, आगामी काळात पक्षातर्फे संघटनात्मक पातळ्यांवर मोठे काम पाहायला मिळणार आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories