पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्यात विविध भागांतील युवकांचा जाहीर प्रवेश झाला आहे. उमाकांत लिंगाडे, श्रीधर महाले आणि प्रज्वल खुटाळ यांच्या समवेत अनेक युवकांनी युवा मोर्चाशी जोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाने दिली.
शहर जिल्हाध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांच्या नेतृत्वाखाली युवकांना संघटनेशी जोडण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सामाजिक कार्य, जनसेवा तसेच युवकांशी संबंधित प्रश्नांवर काम करण्यासाठी या माध्यमातून सक्रिय राहण्याचा निर्धार प्रवेश केलेल्या युवकांनी व्यक्त केल्याचेही नमूद करण्यात आले.
युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे, स्थानिक प्रश्नांवर संवाद साधणे आणि त्यांच्या कौशल्यांना संधी देण्यावर भर दिला जात आहे. शहरातील विविध भागांमध्ये युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी बैठका, जनसंपर्क मोहीम आणि संघटनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या वेळी युवा मोर्चा महाराष्ट्र सचिव तथा प्रभारी अजित कुलथे, सरचिटणीस राहुल खाडे, सुमित घाटे, सम्यक साबळे, राजेश डोंगरे, उपाध्यक्ष मयूर काळभोर, अतुल काळोखे, सचिव गोपाल मंडल, निखिल शहाणे, जालिंदर काटे, रोहित कराळे आणि शिवाजी कारगुडे उपस्थित होते.
तसेच मंडल अध्यक्ष ऋषिकेश भालेकर, आकाश पवार, विद्यार्थी विभागाचे शहर सहसंयोजक साईराज भालेकर, रोजगार व स्वयंरोजगार शहर संयोजक नितीन साळी, रोजगार व स्वयंरोजगार शहर महिला संयोजिका योगिता जाधव, उद्योग आघाडी शहर संयोजक आदित्य कुलकर्णी आणि सहसंयोजक दीपराज गुप्ता यांच्यासह युवा मोर्चाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
युवकांचा हा सहभाग संघटनेच्या शहरातील विस्तारासाठी महत्त्वाचा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आगामी काळात युवकांना मोठ्या संख्येने जोडून सामाजिक, जनहिताचे आणि रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे युवा मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.