news
clock
देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी २८ एप्रिलला पूर्ण पिंपरी-चिंचवडचा सायंकाळचा पाणीपुरवठा राहणार बंद

देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी २८ एप्रिलला पूर्ण पिंपरी-चिंचवडचा सायंकाळचा पाणीपुरवठा राहणार बंद

 देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी २८ एप्रिलला पूर्ण पिंपरी-चिंचवडचा सायंकाळचा पाणीपुरवठा राहणार बंद

पिंपरी, ता. २१ -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी जलशुद्धीकरण केंद्र येथे करण्यात येणाऱ्या स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे येत्या मंगळवारी, दिनांक २८ एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी बुधवारी, दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

महापालिकेने सांगितले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये खंड पडू नये, यासाठी वेळोवेळी पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सेक्टर क्रमांक २३ येथील तसेच क्षेत्रीय स्तरावरील स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी २८ एप्रिल २०२६ रोजी निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरुन होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे २८ एप्रिलला पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार असून २९ एप्रिलला सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल.

नागरीकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा....

''निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी २८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करुन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करुन सहकार्य करावे. देखभाल-दुरुस्तीची सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील राहील.''

- प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories