पिंपरी | ४ ऑक्टोबर २०२६ : हॉटेलच्या रूममध्ये तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या दहा जणांवर पिंपरी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ४ लाख २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ४ ऑक्टोबर रोजी रात्री ११.०३ वाजण्याच्या सुमारास पिंपरीतील रेणुका गुलमोहर सोसायटीसमोरील हॉटेल प्रेस्टीज लॉजच्या रूम क्रमांक १०५ मध्ये करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अंमलदार जावेद शहाबुद्दीन मुजावर यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात दानिश मेहबूब चौधरी (वय ३१), वरनदीप मनजित सोडी (वय ३३), नईममुल्ला अजमतमुल्ला चौधरी (वय ३२), गुड्डू गिरिजाशंकर विश्वकर्मा (वय ३५), रिजवान अकबर चौधरी (वय ३१), रवी रामकिरण भरई (वय ३५), मुजाहीर इब्राहिम औटी (वय ३२), विनोद पप्पू डपोलिया (वय ३४), नौशाद इसाक शेख (वय ३६) आणि हरिश कडिया पुजारी (वय ५८) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
फिर्यादीनुसार, हे सर्वजण हॉटेल प्रेस्टीज लॉजच्या रूम क्रमांक १०५ मध्ये तीन पत्ती जुगार खेळत असताना आढळून आले. कारवाईदरम्यान रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ४ लाख २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४, ५ आणि १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.