शहरात रमजान ईद उत्साहात साजरी
पिंपरी, ता. २१ - 'ईद मुबारक' अशा परस्परांना शुभेच्छा देत शहरात शनिवारी (ता. २१) रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील मस्जिदीमध्ये सामूहिक नमाजपठण करण्यात आले. घरोघरी शीरखुर्मा बनवून सर्वांना त्याचे वाटप करण्यात आले.
रमजान ईद साजरी करण्यासाठी मुस्लीम बांधव सकाळपासूनच मस्जिदींमध्ये तसेच एकमेकांच्या घरी जाताना दिसत होते. शहरात अन्य धर्मीयांनीही मुस्लीम बंधू-भगिनींना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि शीरखुर्म्याचा आस्वाद घेतला.
अनेक ठिकाणी ईद मिलन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रमजान ईदनिमित्त शहरात सर्वत्र उत्साहाचे आनंदाचे वातावरण होते.