मुलीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने वाद; पिंपरीत महिलेला विटेने मारहाण

मुलीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने वाद; पिंपरीत महिलेला विटेने मारहाण

पिंपरी | ४ ऑक्टोबर २०२६ : मुलीला विनाकारण शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने झालेल्या वादातून एका महिलेला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. त्यानंतर महिलेच्या मुलासह त्याच्या मित्रानेही भांडणात पडून मारहाण केल्याची घटना मिलिंदनगर परिसरात घडली. यावेळी एका आरोपीने वीट उचलून महिलेच्या डोक्यात मारल्याने रक्तस्राव होऊन पाच टाके पडले आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरासमोर, जामा मस्जिद शेजारी, मिलिंदनगर, पिंपरी येथे घडली. या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे.

आरोपींमध्ये वैशाली डुकरे (वय अंदाजे ४०, रा. जामा मस्जिद शेजारी, मिलिंदनगर, पिंपरी), तुषार डुकरे (वय ३०) आणि तुषार डुकरे याचा मित्र (वय अंदाजे २८, पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांचा समावेश आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी घरासमोर उभी असताना शेजारी राहणाऱ्या वैशाली डुकरे यांनी फिर्यादीची आई म्हणाली की, “तुझा नातू माझ्या मुलीला विनाकारण शिवीगाळ करत असतो” असे सांगितले. त्यावरून फिर्यादी आणि त्यांच्या आईला शिवीगाळ करून हाताने मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर वैशाली डुकरे यांचा मुलगा तुषार आणि त्याचा मित्र तेथे आले. आईबरोबर भांडण सुरू असल्याचे पाहून त्यांनीही शिवीगाळ व हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तुषारने घरासमोर पडलेली वीट उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारली. त्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्त येऊन दुखापत झाली आणि पाच टाके पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories