news
clock
'पीएमपी'च्या ताफ्यात दाखल होणाऱ्या नवीन गाड्यांच्या पार्किंगसाठी १०० एकर जागेची मागणी

'पीएमपी'च्या ताफ्यात दाखल होणाऱ्या नवीन गाड्यांच्या पार्किंगसाठी १०० एकर जागेची मागणी

 'पीएमपी'च्या ताफ्यात दाखल होणाऱ्या नवीन गाड्यांच्या पार्किंगसाठी १०० एकर जागेची मागणी

'पीएमपी' प्रशासनाचा पुणे-पिंपरी-चिंचवड मनपा, पीएमआरडीए, एमआयडीसीकडे प्रस्ताव  

पुणे, ता. ७ - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात यंदा १ हजार ७०० नवीन बस दाखल होणार आहेत. या गाड्यांच्या त्यांच्या पार्किंग आणि देखभालीसाठी नवीन डेपो उभारावे लागणार आहेत.  ५५ नवीन आगार व टर्मिनल उभारण्यासाठी पीएमपी प्रशासनाने १०० एकर जागेची मागणी केली. त्यासाठीचा प्रस्ताव पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेसह विविध प्राधिकरणांकडे हा प्रस्ताव पाठविला आहे.

सध्या 'पीएमपी'च्या ताफ्यात २०७२ बस आहेत व त्यासाठी फक्त १७ आगार आहेत. बसेसची संख्या वाढली की जागा अपुरी पडणार आहे. त्यामुळे, पीएमपी प्रशासनाने जागेची मागणी केली आहे. यामध्ये पुणे महापालिकडे २४ जागा, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे १९ जागा, 'पीएमआरडीए'कडे ३ जागा, 'एमआयडीसी'कडे २ जागा व जिल्हाधिकारी क्षेत्रात १९ जागांची मागणी केली आहे. 

'पीएमपी'मधून सध्या दररोज सरासरी १२ लाख प्रवासी प्रवास करतात.'पीएमपी'चे दैनंदिन उत्पन्न सुमारे दिड कोटी आहे. 'पीएमपी'ची सेवा हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे, 'पीएमपी'ची सेवा अधिक मजबूत करण्यासाठी नवीन आगारांची उभारणी करणे महत्त्वाचे आहे. 

याबाबत बोलताना 'पीएमपी'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड म्हणाले, '' 'पीएमपी'च्या ताफ्यातील वाढत्या बससाठी मोठ्या जागेची गरज आहे. विविध संस्थांकडे जागेची मागणी केली असून, ती उपलब्ध झाल्यास नवीन बसचे संचलन सुरळीत होईल.''



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories