मुळशी तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी 'पीएमआरडीए'ची बैठक

मुळशी तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी 'पीएमआरडीए'ची बैठक

मुळशी तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी 'पीएमआरडीए'ची बैठक 

पिंपरी, ता. २३ - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील मुळशी तालुक्यातील माण, म्हाळुंगे, मारुंजी, हिंजवडी तसेच इतर गावांच्या पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयात पार पडली.

या बैठकीस भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरस्थ प्रणालीद्वारे), तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी आणि पीएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 पीएमआरडीए हद्दीतील माण, म्हाळुंगे, मारुंजी, हिंजवडी आणि परिसरातील गावांना पुरेसा, दर्जेदार व अखंडित पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी पाण्याची उपलब्धता आणि विविध पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. तसेच, संबंधित विभागांमधील समन्वय वाढवून प्रलंबित कामांना गती देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत नागरिकांना अधिक सक्षम व शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories