news
clock
पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या नूतनीकरणाचे काम पुढे ढकलले

पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या नूतनीकरणाचे काम पुढे ढकलले

 पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या नूतनीकरणाचे काम पुढे ढकलले

पुणे, ता. १५ - पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या नूतनीकरणाचे (रिकार्पेटिंग) काम एप्रिलमध्ये सुरू होणे अपेक्षित होते. पण ते झाले नाही. उन्हाळी सुट्ट्यांमुळे हवाई दलाने प्रवासी वाहतूक बंद असलेल्या 'नोटम'च्या वेळेतच दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे काम आता  पावसाळ्यानंतरच होणार आहे.हवाई दलाने दिलेल्या 'नोटम'च्या (नोटीस टू एअरमन) वेळेतच हे काम केले जाणार आहे. 

पुणे विमानतळाच्या धावपट्टीचे काम एप्रिलमध्ये सुरू होणे अपेक्षित होते, मात्र एप्रिलचा पंधरवडा उलटूनही कामाला सुरुवात झालेली नाही. उन्हाळी सुट्टयांमुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते.  त्यामुळे  विमान कंपन्यांनी सेवा सुरळित राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती.  सेवेत खंड नको अशी भूमिका घेतली होती.  त्यांचा विचार करुन हवाई दलाने प्रवासी वाहतूक बंद असलेल्या 'नोटम'च्या वेळेतच दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीनगर विमानतळावरही अशाच कारणामुळे काम पुढे ढकलण्यात आले आहे.

पुणे विमानतळावरून लढाऊ आणि प्रवासी अशा दोन्ही विमानांची उड्डाणे होतात. धावपट्टी विस्तारीकरणासाठी काही काळ ती बंद ठेवण्याच्या सूचना हवाई दलाने दिल्या होत्या. मात्र, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आता केवळ 'नोटम' कालावधीतच काम होईल. धावपट्टीच्या कामाबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे. काम कधी सुरू होईल, हे निश्चित सांगता येणार नाही, असे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories