पुणे जिल्ह्यातील आठ प्रमुख धरणांच्या सुरक्षिततेचा घेतला जातोय आढावा

पुणे जिल्ह्यातील आठ प्रमुख धरणांच्या सुरक्षिततेचा घेतला जातोय आढावा

पुणे जिल्ह्यातील आठ प्रमुख धरणांच्या सुरक्षिततेचा घेतला जातोय आढावा

पुणे, ता. 12 -   पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, गुंजवणी, वीर, देवघर आणि भाटघर या आठ प्रमुख धरणांच्या सुरक्षिततेचा सर्वंकष आढावा घेतला जात आहे.

 केंद्रीय जल आणि वीज संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) येत्या वर्षभरात या धरणांचे तांत्रिक मूल्यांकन करून संरचनात्मक स्थिती व सुरक्षिततेचा अहवाल जलसंपदा विभाग आणि राज्य सरकारकडे सादर करणार आहे.

या मूल्यांकनात धरण उभारण्यापूर्वीच्या सर्वेक्षणापासून ते आजपर्यंतच्या संपूर्ण माहितीचा अभ्यास केला जाणार आहे. धरणाची सुरक्षितता, जलसाठा आणि गाळाची स्थिती, भूकंपविषयक निकष, पाया (फाउंडेशन) आणि हवामान बदलाचा परिणाम या घटकांच्या आधारे उपाययोजना निश्चित करून धरणांचे आयुर्मान वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल.

दीर्घकालीन सुरक्षिततेचा आढावा घेतला जाणार

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, राज्य सरकारसोबत सामंजस्य करार झाला आहे. या करारांतर्गत पहिल्या टप्प्यात खडकवासला आणि पुणे पाटबंधारे विभागातील आठ धरणांचे स्थापत्य लेखापरीक्षण व सर्वकष मूल्यांकन करून त्यांच्या दीर्घकालीन सुरक्षिततेचा आढावा घेतला जाणार आहे. यासाठी विशेष तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे, प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे.

- अनिल पुरोहित, प्रभारी संचालक, केंद्रीय जल आणि वीज संशोधन केंद्र


सुरक्षिततेसाठी धरणांचे वर्गीकरण असे -

'अ' गट : धरणाची धोकादायक स्थिती, सुरक्षितता आणि संभाव्य धोका यांचे मूल्यांकन

'ब' गट : धरणाचे स्थापत्य परीक्षण, सध्याची स्थिती आणि संरचनेची तपासणी

'क' गट : आवश्यक किरकोळ दुरुस्ती व देखभाल कामांचा आढावा


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories