रावेतमधील होर्डिंग कारवाई बाबत आम आदमी पार्टी आक्रमक!

रावेतमधील होर्डिंग कारवाई बाबत आम आदमी पार्टी आक्रमक!

पिंपरी-चिंचवड : रावेत परिसरातील अनधिकृत आणि नियमबाह्य जाहिरात फलकांवरील निष्कासनाची कारवाई अचानक थांबविण्यात आल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे युवक अध्यक्ष विकी रोहिदास पासोटे आणि सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ जावीर यांनी केला आहे. या कारवाईच्या निषेधार्थ आकाशचिन्ह व परवाना विभागाला प्रतीकात्मक स्वरूपात ‘पैशाने भरलेला होर्डिंग’ भेट देण्यात आले.

पासोटे यांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त राजेश आगळे यांनी २९ जुलै २०२६ रोजी मे. भवानी कन्स्ट्रक्शनचे दोन आणि मे. बिग इंडिया ग्रुपचा एक असे तीन जाहिरात फलक अनधिकृत अथवा थकीत तसेच मंजूर मोजमापापेक्षा मोठे असल्याच्या कारणावरून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी निष्कासनाच्या कारवाईचे आदेश देण्यात आले होते.

मात्र, १५ सप्टेंबर रोजी कोणतेही स्पष्ट लेखी कारण न देता बीट निरीक्षक किशोर गावडे यांच्या तोंडी सांगण्यावरून ही कारवाई थांबविण्यात आल्याचा दावा पासोटे आणि जावीर यांनी केला आहे. कारवाईचे आदेश असताना ती का थांबविण्यात आली आणि संबंधित होर्डिंगधारकांना विशेष सवलत देण्यात आली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या २२ सप्टेंबरच्या उत्तरात मे. भवानी कन्स्ट्रक्शनने सुमारे १२.४२ लाख रुपयांची थकीत रक्कम भरल्यानंतर त्यांचे प्रकरण निकाली काढण्यात आले. तर मे. बिग इंडिया ग्रुपने थकीत रक्कम न भरल्याने त्यांच्यावर अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

यावेळी विकी पासोटे, ॲड. सुप्रिया गायकवाड, अजय सिंह, निकेत शिंदे, शिवकुमार बनसोडे, अंकुश डोंगरे, लक्ष्मण माने, सोनू हिंगे, गौतम तायडे, सूरज झिटे, आशिष डोंगरे आणि सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ जावीर उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories