मेट्रो स्टेशन परिसरात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी संयुक्त आढावा बैठक

मेट्रो स्टेशन परिसरात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी संयुक्त आढावा बैठक

मेट्रो स्टेशन परिसरात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी संयुक्त आढावा बैठक

पिंपरी, ता. ८ ऑगस्ट २०२६ - शहरातील मेट्रो स्थानकांच्या परिसरात इलेक्ट्रिक वाहनधारकांना अधिक सुलभ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेमध्ये महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. 

या बैठकीत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी  योग्य ठिकाणांची निवड, वीजपुरवठा, आवश्यक पायाभूत सुविधा, अंमलबजावणीची कार्यपद्धती तसेच भविष्यातील वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचा विचार करून नियोजनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

मेट्रो स्थानकांच्या परिसरात इलेक्ट्रिक वाहनधारकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करुन देणे हे पर्यावरणपूरक, शाश्वत आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देत पिंपरी-चिंचवड शहराला हरित व स्मार्ट शहर बनविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories