'आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप शासनाने हस्तक्षेप करुन थांबवावा, कामकाज सुरळीत करावे'

'आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप शासनाने हस्तक्षेप करुन थांबवावा, कामकाज सुरळीत करावे'

'आरटीओ कर्मचाऱ्यांचा संप शासनाने हस्तक्षेप करुन थांबवावा, कामकाज सुरळीत करावे'

राष्ट्रवादी वाहतूक सेल शहराध्यक्ष विनोद वरखडे यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पिंपरी, ता. २३ -  मोटर वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटनेने 16 जूनपासून पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. आरटीओशी संबंधित प्रलंबित कामांवर या संपाचा परिणाम होत आहे. त्यामुळे, आरटीओ कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असतील तर त्यावर शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. हा संप तातडीने मागे घेऊन आरटीओ कार्यालयाचे कामकाज पूर्ववत करावे, अशी मागणी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतूक सेलचे शहराध्यक्ष विनोद वरखडे यांनी राज्याचे परिवहन मंत्री व परिवहन आयुक्तांकडे केली आहे. 

 याबाबतचे निवेदन वरखडे यांनी सोमवारी (ता. २२) पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे दिले आहे. या निवेदनात वरखडे यांनी म्हटले आहे की, आरटीओ कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असतील तर त्यावर शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. या संपाशी कोणताही संबंध नसल्याने वाहनधारकांना आणि प्रवाशांना विनाकारण वेठीस धरणे योग्य नाही.  या संपामुळे महत्त्वपूर्ण सेवा विस्कळीत झाल्या आहेत, सामान्य वाहनधारक आणि परिवहन व्यवसायिक प्रचंड अडचणीत सापडले आहेत. आरटीओ कार्यालयांमध्ये वाहन नोंदणी व हस्तांतरण, ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण, परमिट नूतनीकरण तसेच वाहनकर भरणा व खटला विभागाचे कामकाज सुरळीत करून वाहनधारकांना सहकार्य करावे.  अनेक कामे ठप्प झाल्याने वाहनधारकांचे आर्थिक नुकसान होत आहेच आणि  कामकाज ठप्प असल्याने आरटीओ विभागातून शासनाला मिळणाऱ्या महसूलला ब्रेक लागला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित हस्तक्षेप करून संप मागे घेण्यासाठी आवश्यक ते पावले उचलून आरटीओ कार्यालयाचे कामकाज सुरळीत करावे.

सदर निवेदन देताना वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप औटी , सामाजिक कार्यकर्ते आप्पा साहेब दौंडे, अनिल शेठ ढोरे पाटील अदी पदाधिकारी उपस्थित होते.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories