भव्य 'हर घर तिरंगा अभियान' ​पिंपरी-चिंचवड शहरात राबवणार - शत्रुघ्न काटे

भव्य 'हर घर तिरंगा अभियान' ​पिंपरी-चिंचवड शहरात राबवणार - शत्रुघ्न काटे

भव्य 'हर घर तिरंगा अभियान' ​पिंपरी-चिंचवड शहरात राबवणार - शत्रुघ्न काटे 

पिंपरी, ता. ८ ऑगस्ट २०२६ - "राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पिंपरी- चिंचवड शहरातील प्रत्येक प्रभागात आणि घराघरांत 'हर घर तिरंगा' अभियान व भव्य 'तिरंगा यात्रा' पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी पूर्णपणे सज्ज आहे. बूथ पातळीपर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे उभारून नागरिकांना तिरंगा उपलब्ध करून देणे आणि राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखत हा उत्सव सर्वदूर साजरा करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने उतरतील.", असे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले. 

भाजपकडून 'हर घर तिरंगा'  या अभियानासाठी पूर्वतयारी आणि नियोजन बैठकीचे शुक्रवारी (ता. ७) आयोजन करण्यात आले होते. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत ​या नियोजन बैठकीत अभियानाची रूपरेषा, ध्वज वाटप व्यवस्थापन, प्रसार-प्रचार, तिरंगा यात्रेचे नियोजन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनाबाबत चर्चा झाली.  तिरंगा यात्रा अत्यंत भव्य, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी मार्गावरील नियोजन, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीला पक्षाचे प्रदेश सरचिटणीस  राजेश पांडे, पुणे भाजप शहराध्यक्ष  धीरज घाटे, पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद, ग्रामीण बारामती जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, संगठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस  विकास डोळस, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटणी, शिवराज लांडगे, प्रमोद परदेशी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories