दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाचे खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाचे खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाचे खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन 

पिंपरी, ता. ८ ऑगस्ट २०२६ -  मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव –२०२६’ चे उद्घाटन शुक्रवारी (ता. ७) खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीत कार्यान्वित करण्यात येणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचेही उद्घाटन झाले. 

नवी दिल्ली डॉ आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित या उद्घाटन सोहळ्यास खासदार तावडे यांच्यासह  निवासी आयुक्त श्वेता सिंघल, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वित्तीय सल्लागार चित्रलेखा खातू आदी उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी खासदार विनोद तावडे यांनी मराठी साहित्य, नाटक आणि चित्रपटांचा भारतीय चित्रपटसृष्टीवर पडलेला प्रभाव अधोरेखित केला. दिल्लीसह देशभरात मराठी कला, संस्कृती आणि साहित्याबद्दल मोठा आदर असून, मराठी चित्रपट व नाट्यकृतींनी अनेक हिंदी आणि इतर भारतीय भाषांतील चित्रपटांना प्रेरणा दिल्याचे त्यांनी सांगितले.

दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव' नियमितपणे आयोजित करण्यात येईल, असे यावेळी  जाहीर करण्यात आले. तसेच महाराष्ट्र सदनामध्ये वर्षभर दर महिन्याला एका शनिवारी मराठी चित्रपटांचे नियमित प्रदर्शन आणि चित्रपट रसास्वाद उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories