आवश्यक कागदपत्रांसाठी १४० आरएमसी प्लांट्सना 'पीएमआरडीए'कडून नोटिस

आवश्यक कागदपत्रांसाठी १४० आरएमसी प्लांट्सना 'पीएमआरडीए'कडून नोटिस

आवश्यक कागदपत्रांसाठी १४० आरएमसी प्लांट्सना 'पीएमआरडीए'कडून नोटिस

पिंपरी, ता. ८ ऑगस्ट २०२७ - पिंपरी-चिंचवड या शहरांलगत असलेल्या सुमारे १४० आरएमसी (रेडी मिक्स कॉक्रिट) प्लांट्सना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नोटिस बजावल्या. त्यानुसार परवानगी, आवश्यक कागदपत्रे तसेच इतर माहिती मागविण्यात आली आहे. अंतिम निर्णयासाठी ही माहिती नियोजन विभागाकडे पाठवण्यात आली आहे.

या आरएमसी प्लांटबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यांच्या परवानगीबाबत माहिती जमा करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला होता. त्यानुसार अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने सर्व तालुक्यांचे सर्वेक्षण केले. मुळशी, मावळमध्ये सर्वाधिक प्लांट आढळले. सर्व प्लांटधारकांना नोटिसा देण्यात आल्या. बहुतांश प्लांटधारकांनी माहिती पाठविली. 

महानगर नियोजनकार स्मीता कलकुटकी माहितीची छाननी करणार आहेत. परवानगी व कागदपत्रे नसलेल्या प्लांटवर कारवाई होईल. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळालाही माहिती दिली जाईल, अशी माहिती 'पीएमआरडीए'ने दिली आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories