पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड, हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि अनुप मोरे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत ‘सुरक्षित युवा, सशक्त भारत’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. अजय दुधाने आणि डॉ. विजय मोरे यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले.
युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि जबाबदार जीवनशैली स्वीकारावी तसेच नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सक्रिय सहभाग घ्यावा, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवक-युवती आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी आमदार शंकर जगताप, भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, सरचिटणीस वैशाली खाडे, मधुकर बच्चे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, तुषार हिंगे, रेखा देवकर, उदय गायकवाड, माऊली थोरात, मंगेश घाडगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस सुमित घाटे, राहुल खाडे तसेच हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सन्मान घाडगे यांच्यासह कृष्णा कदम, किरण लोखंडे, प्रतीक पाटील, यश सांभेराव आणि प्रशांत आलमेल यांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमातून ‘नशामुक्त भारत, सुरक्षित युवा आणि सशक्त राष्ट्र’ हा संदेश देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.