छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करा!

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करा!

पुणे | ३० सप्टेंबर २०२६ : छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, विद्वत्ता, प्रशासन, साहित्यनिर्मिती, बलिदान आणि स्वराज्यरक्षणातील योगदान विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने पोहोचावे, यासाठी त्यांच्या इतिहासाचा शालेय अभ्यासक्रमात समर्पक समावेश करण्याची मागणी शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारती, पुणे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

इयत्ता पाचवी किंवा त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवनकार्यावर आधारित स्वतंत्र पाठ्यपुस्तक प्रकाशित करावे, अशी प्रमुख मागणी प्रतिष्ठानने केली आहे. ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे त्यांच्या कार्याचा अभ्यासक्रमात समर्पक समावेश करण्यासोबत विद्यार्थ्यांना विषय सहजपणे समजण्यासाठी चित्रे, कालरेषा (Timeline) आणि पूरक माहितीचाही वापर करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

याच मागणीच्या अनुषंगाने शिवशाही प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी शिवव्याख्याते व इतिहास अभ्यासक नितीन बानगुडे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित स्वतंत्र शालेय पाठ्यपुस्तकाची आवश्यकता आणि त्यांच्या इतिहासाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

प्रतिष्ठानचे प्रदेश कार्याध्यक्ष अथर्व तावरे म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण पद्धतीने समजणे आवश्यक आहे. त्यांच्या शौर्य, विद्वत्ता आणि स्वराज्यरक्षणातील योगदानाचा समर्पक समावेश शालेय अभ्यासक्रमात व्हावा.”

संस्थापक अध्यक्ष राज जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनकार्य पुढील पिढीपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचावे, यासाठी प्रतिष्ठान सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories