निगडी-प्राधिकरणात रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचन उपक्रम सुरु
निगडी-प्राधिकरणात रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचन उपक्रम सुरु
पिंपरी, ता. २७ - शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने निगडी- प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयात मोफत वाचन उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत १६ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी कथा, कादंबऱ्या, रंजक पुस्तके, विविध मासिके, वृत्तपत्रे तसेच अभ्यासपूरक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ग्रंथालयातील शांत, सुरक्षित व प्रेरणादायी वातावरणामुळे मुलांना अभ्यासासाठी अनुकूल सुविधा मिळत आहेत. पालकांनी आवर्जून आपल्या मुलांना या उपक्रमात सहभागी करावे, असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
मोफत वाचनाचा हा उपक्रम ३१ मेपर्यंत सकाळी ९.३० ते ११.३० आणि सायंकाळी ५.०० ते ७.३० या वेळेत सुरु राहणार आहे.
- love for reading, up to 16 years, stories
- , Nigdi-Pradhikaran, Rabindranath Thakur Public Library
- School students, free reading program
- कथा, कादंबऱ्या, रंजक पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे, अभ्यासपूरक साहित्य
- वाचनाची आवड, १६ वर्षापर्यंत
- निगडी-प्राधिकरण, रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालय
- शालेय विद्यार्थ्यांसाठी, मोफत वाचन उपक्रम