news
clock
तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत मतदारयादी पुनर्निरीक्षण  मोहिमेचा प्रारंभ

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत मतदारयादी पुनर्निरीक्षण मोहिमेचा प्रारंभ

 तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत मतदारयादी पुनर्निरीक्षण  मोहिमेचा प्रारंभ 

पिंपरी, ता. २७ - केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात मतदारयादी पुनर्निरीक्षण मोहिमेस सुरुवात झाली आहे. या मोहिमेद्वारे नागरिकांनी आपले नाव मतदारयादीत आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी केले आहे.

नगरपरिषद क्षेत्रातील २०२४ च्या मतदारयादीची सन २००२ च्या मतदारयादीशी पडताळणी करण्यात येत आहे. ज्या मतदारांची नावे सन २००२ मध्ये होती. मात्र, सध्याच्या यादीत सापडत नाहीत, अशा मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच निधन झालेले किंवा स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याची कार्यवाहीदेखील केली जाणार आहे.  

या कामासाठी कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी आपले नाव तपासण्यासाठी संकेतस्थळाचा किंवा मोबाईल अॅपचा वापर करावा. अडचणीसाठी संबंधित बूथ लेव्हल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून पात्र मतदारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी दापकेकर यांनी केले आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories