शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवरायांना अभिवादन

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवरायांना अभिवादन

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवरायांना अभिवादन 

पिंपरी, ता. ६ - शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शनिवारी (ता. ६) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी भक्ती-शक्ती उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच संत तुकराम महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे तब्बल २७ वर्षे वास्तव्य असलेल्या गडांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजगडाच्या वैभवशाली इतिहासावर आधारित 'गडांचा राजा… राजगड' या पुस्तकाचे प्रकाशन महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी आमदार अमितजी गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्या शैलजा मोरे, अमित गावडे, सनय छत्रपती शासन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेवराव जाधव आणि नागरीक उपस्थित होते.  तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories