news
clock
आंद्रा जलवाहिनी प्रकल्पासाठी सुमारे ११८ कोटी रुपयांचा प्रस्ताव, तळेगाव नगरपरिषेदची माहिती

आंद्रा जलवाहिनी प्रकल्पासाठी सुमारे ११८ कोटी रुपयांचा प्रस्ताव, तळेगाव नगरपरिषेदची माहिती

आंद्रा जलवाहिनी प्रकल्पासाठी सुमारे ११८ कोटी रुपयांचा प्रस्ताव, तळेगाव नगरपरिषेदची माहिती  

नगरपरिषदेच्या पत्रकार परिषदेत विविध विकासकामांचा मांडला गेला आढावा  

पिंपरी,  ता. २२ -  तळेगावमध्ये १०० बेड्सचे आधुनिक रुग्णालय उभारले जात आहे. आंद्रा जलवाहिनी प्रकल्पासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून ५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षण मंजूर झाले आहे, या प्रकल्पासाठी सुमारे ११८ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे,  अशी माहिती तळेगाव नगरपरिषदेच्या वतीने नुकतीच पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

शहरातील विविध विकासकामांचा आढावा या पत्रकार परिषदेत मांडला गेला. यावेळी नगराध्यक्ष संतोष दाभाडे, आमदार सुनील शेळके, उपनगराध्यक्ष गणेश काकडे तसेच नगरसेवक उपस्थित होते. नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, विविध प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. 

पाणीपुरवठा सुधारण्यासाठी तळेगाव स्टेशन येथे इंद्रायणी जलशुद्धीकरण प्रकल्प (३ एमएलडी) सुरु आहे, गेली नऊ वर्षे रखडलेला हिंदमाता भुयारी मार्ग पूर्ण करुन त्याचे डांबरीकरण केले जात आहे,  सांडपाणी व्यवस्थापनासाठी गावतळ्याजवळील प्रलंबित वाहिनीचे काम सुरु आहे, यशवंतनगर येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे सुमारे ४० टक्के काम पूर्ण, उर्वरित काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट फेरीवाले, भाजी विक्रेत्यांसाठी तीन ठिकाणी स्वतंत्र भाग निश्चित करण्यात आले आहेत, लिंब फाटा ते स्टेशन चौक आणि बीएसएनएल ते मुंबई पुणे मार्ग या प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण केले जात आहे, विद्युत वाहिन्या टप्प्याटप्याने भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, भुयारी गटार योजनेचे सर्वेक्षण पूर्ण, नवीन अंदाजपत्रकावर काम सुरु आहे, सोमाटणे जलवाहिनी प्रकल्पातील अडचणी सोडवण्यावर भर, नवीन स्मशानभूमीची उभारणी केली जात आहे, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन विकास आराखडा 'डीपी' रस्त्यांसाठी पाठपुरावा सुरु आहे,  पूर्वीच्या ७३ कोटी रुपयांच्या योजनेतील अपूर्ण ३२ किलोमीटर काम पूर्ण करण्यासाठी नव्याने नियोजन आहे, सुमारे १५ कोटी रुपयांचे क्रीडा संकुल, नाट्यगृह उभारणीची परवानगी अंतिम टप्प्यात आहे, सरसेनापती उमाबाई दाभाडे कन्याशाळेचे बांधकाम वेगाने सुरु आहे,  नवीन शाळांचे आराखडे, भूमिपूजन प्रक्रिया सुरु आहे.. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories