वाहनचोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक, ४ मोटार सायकल व १ ऑटो रिक्षा जप्त

वाहनचोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक, ४ मोटार सायकल व १ ऑटो रिक्षा जप्त

वाहनचोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक, ४ मोटार सायकल व १ ऑटो रिक्षा जप्त

पिंपरी, ता. ३० जुलै २०२६ - चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत होणाऱ्या वाहनचोरीच्या घटनांचा तपास करताना चिखली पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने वाहनचोरी करणाऱ्या दोन तरुणांना अटक केली केली आहे. त्यांच्याकडून एकूण २ लाख ९५ हजार रुपये किंमतीच्या ४ मोटार सायकल व १ ऑटो रिक्षा जप्त  करण्यात आली आहे.  राज संतोष बापर्डेकर (वय -२३ वर्षे, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) व शंकरसिंग समंदरसिंग टाक (वय १८ वर्षे, रा. गाडीतळ, हपडसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.  

चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत होणाऱ्या वाहनचोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी तपास पथकाने १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता रेकार्डवरील वाहनचोर राज बापर्डेकर हा साथीदारांसह वाहन चोरी करीत असल्याची खात्री झाली. गोपनीय बातमीदाराबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी राज संतोष बापर्डेकर व शंकरसिंग समंदरसिंग टाक यांना पोलिसांनी शिताफिने ताब्यात घेतले. 

दोन्ही आरोपींकडे कशोसीने तपास केला असता, त्यांनी ५ वाहन चोरी व २ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून वाहन चोरीच्या गुन्ह्यांतील एकूण २,९५,०००/- रुपये किंमतीच्या ४ मोटार सायकल व १ ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे.  अटक आरोपी राज संतोष बापर्डेकर हा पोलीस रेकार्डवरील गुन्हेगार असून, त्याचेविरुध्द १२ वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच शंकरसिंग समंदरसिंग टाक हा सराईत गुन्हेगार असुन, तो खालील ०४ गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अप्पर पोलिस आयुक्त बसवराज तेली, अप्पर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, परिमंडळ - ४ च्या पोलिस उपआयुक्त श्वेता खेडकर,  सहाय्यक पोलिस आयुक्त देहूरोड विभाग प्रविण मोरे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली पोलिस स्टेशन रणजित जाधव, चिखली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण तसेच पोलिस हवालदार किरण काटकर, विनोद व्होनमाने, प्रविण भोमाळे, सुरज सुतार, अरुण साबळे, भरत माने, संतोष भालेराव, अजय गायकवाड, कंठय्या स्वामी, रोहीत मोरे, पोलिस शिपाई अनिल राक्षे व संतोष भोर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories