राष्ट्रीय थाई किकबॉक्सिंगमध्ये अल्टिमेट स्पोर्ट्सची ११ पदके, एक टायटल बेल्ट

राष्ट्रीय थाई किकबॉक्सिंगमध्ये अल्टिमेट स्पोर्ट्सची ११ पदके, एक टायटल बेल्ट

पिंपरी-चिंचवड | ६ ऑक्टोबर २०२६ : मापुसा, गोवा येथे २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या तिसऱ्या नॅशनल थाई किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये अल्टिमेट स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्सच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. संघाने २ सुवर्ण, ७ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण ११ पदके, तसेच एक प्रोफेशनल टायटल बेल्ट पटकावला. या कामगिरीच्या जोरावर संस्थेने द्वितीय चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवली.

स्पर्धेत श्रुतिका मोरे आणि धनश्री शिंपले यांनी सुवर्णपदक पटकावले. आदित्य पवार, साईराज कांबळे, प्रतीक मुंडे, हर्षिणी अरमोगन, श्रेया कदम, हर्षवर्धन कदम आणि अदिती तांबे यांनी रौप्यपदकांची कमाई केली. तर अश्मित तुपदार आणि स्वरांश बादणे यांनी कांस्यपदक मिळवले.

याशिवाय कुणाल जोगदंड यांनी प्रोफेशनल टायटल बेल्ट पटकावत संघाच्या यशात आणखी भर घातली.

या खेळाडूंना अल्टिमेट स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्सचे संस्थापक व मुख्य प्रशिक्षक अविनाश पवार, तसेच वरिष्ठ प्रशिक्षक कुणाल जोगदंड आणि आदित्य पवार यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले.

या यशाबद्दल पिंपरी-चिंचवडचे मा. स्वीकृत नगरसेवक नवनाथ नढे यांनी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. खेळाडूंच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक करत भविष्यातही त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories