उपायुक्त संदीप खोत, सहाय्यक आयुक्त परशुराम वाघमोडे व तानाजी नरळे यांच्या कार्यभारात बदल
Apr 22 2026
43
उपायुक्त संदीप खोत, सहाय्यक आयुक्त परशुराम वाघमोडे व तानाजी नरळे यांच्या कार्यभारात बदल
पिंपरी, ता. २२ - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनामध्ये काही अधिकाऱ्यांच्या कार्यभारात बदल झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने मंगळवारी (ता. २१) याबाबत आदेश देण्यात आले. उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त कार्यभार, सहायक आयुक्त परशुराम वाघमोडे यांच्याकडे ई क्षेत्रीय कार्यालयाचा व तानाजी नरळे यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, कामगार कल्याण व अभिलेख कक्षाचा पदभार सोपवण्यात आला आहे.
संदीप खोत हे पशुवैद्यकीय व कामगार कल्याण विभागाचे उपायुक्त होते. आता त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार (पशुवैद्यकीय विभागासह) सोपविला आहे. उपायुक्त खोत यांच्याकडील कामगार कल्याण विभागाचा पदभार सहायक आयुक्त तानाजी नरळे यांच्याकडे देण्यात आला आहे. याशिवाय सहायक आयुक्त नरळे यांच्याकडे सहायक आयुक्त परशुराम वाघमोडे यांच्याकडे असणारे आपत्ती व्यवस्थापन व अभिलेख कक्षाचादेखील पदभार दिला आहे. तर, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांच्याकडील सध्याचा ई क्षेत्रीय कार्यालयाचा क्षेत्रीय अधिकारी पदाचा पदभार सहायक आयुक्त परशुराम वाघमोडे यांच्याकडे सोपविला आहे.