वाकड येथील बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी 'एसआयटी'ची स्थापना

वाकड येथील बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी 'एसआयटी'ची स्थापना

 वाकड येथील बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी 'एसआयटी'ची स्थापना

पिंपरी, ता. ३० जुलै २०२६ -  वाकड परिसरात दहा व चार वर्षाच्या दोन सख्ख्या बहिणींवर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका ६१ वर्षांच्या नराधमाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तीव्र संतापजनक घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली. या घटनेचा प्रकरणाचा तपास अधिक प्रभावी, पारदर्शक आणि वेगाने पूर्ण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन केली आहे.

विशेष तपास  या पथकाच्या प्रमुखपदी सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) सुनील कुऱ्हाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, पथकात पाच अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणातील घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, डिजिटल पुरावे तसेच साक्षीदारांचे जबाब यांची सखोल पडताळणी करण्यात येणार आहे. तपास जलदगतीने पूर्ण करून लवकरात लवकर न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

या घटनेतील आरोपी रमझान बागवान (वय ६१) याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. या संवेदनशील प्रकरणात बालिकांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी दोषारोपपत्र वेळेत न्यायालयात दाखल करण्यावर पोलिस प्रशासनाचा भर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.








Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories