हॉर्न वाजवल्याच्या रागातून मारहाण; आरोपींना अटक

हॉर्न वाजवल्याच्या रागातून मारहाण; आरोपींना अटक

वाकड | ३० सप्टेंबर २०२६ : हॉर्न वाजवल्याच्या  कारणावरून झालेल्या वादातून २८ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत हॉकीस्टिक आणि लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना वाकड परिसरातील पकवान हॉटेलजवळ घडली. या मारहाणीत फिर्यादीसह त्याचा मित्र जखमी झाला असून, वाकड पोलिसांनी तिघांसह इतर दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत अनंता काळोखे (वय २८,  रा. भुंगाव, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मोहम्मद नफिस रशीद कुरेशी (वय ४०), हमजा नफिस कुरेशी (वय १८ वर्षे ), शहाबान अब्दुल माजिद शेख (वय २२) आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

फिर्यादीनुसार, ३० सप्टेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास फिर्यादी त्यांची मारुती सुझुकी ब्रेझा कार चालवत होते. त्यांचा मित्र नितेश वीर हिरेगौड पाठीमागे बसला होता. पकवान हॉटेलच्या शेजारी जगताप डेअरीजवळ ते जात असताना डिसेंट फर्निचरच्या मालकाच्या मुलाला कारचा हॉर्न दिला. याचा राग आल्याने त्याने फिर्यादीला शिवीगाळ केल्याने दोघांमध्ये वाद झाला.

त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनरमधून आरोपींसह अन्य व्यक्ती तेथे आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी हातातील हॉकीस्टिक आणि लाकडी दांडक्याने फिर्यादी व त्यांच्या मित्राला मारहाण केली. या मारहाणीत दोघेही जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories