news
clock

व्हॉट्सअॅप ट्रेडिंगमध्ये नफ्याच्या आमिषाने ३०.५० लाखांची फसवणूक

पिंपरी, ता. १० - व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन ट्रेडिंगमध्ये मोठा आर्थिक नफा करून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ३० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे राजे शिवाजीनगर, चिखली (ता. हवेली, जि. पुणे) येथे राहतात. २३ सप्टेंबर २०२५ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आरोपी महिलेने फिर्यादीस ‘NWMG-Fortune Navigator Club’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले. संबंधित महिला स्वतःला ‘Nuvama High Networth’ कंपनीशी संबंधित असल्याचे सांगत ट्रेडिंग अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले.

त्यानंतर शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा करुन देण्याचे आश्वासन देत आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. वेळोवेळी विविध बँक खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगून आरोपीने फिर्यादीकडून एकूण ३० लाख ५० हजार रुपये घेतले. त्यामध्ये बँक ऑफ बडोदा, करूर वैश्य बँक आणि येस बँकेच्या खात्यांचा समावेश आहे. रक्कम जमा करून घेतल्यानंतर आरोपीने पैसे परत न देता फिर्यादीचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२), ३१६(२) तसेच माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(ड) अन्वये चिखली पोलीस ठाण्यात ९ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories